अभियान मार्फत दिव्यांगाना मिळाले कृत्रिम हात पालघर : महाराष्ट्र ग्राम सामाजिक वरखंडा यांनी मासेमारी करताना मनगटा आला. डॉ. जितेश कारिया यांचेशी संपर्क

महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान मार्फत दिव्यांगाना मिळाले कृत्रिम हात


महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान पालघर च्या माध्यमातून दोन अपंगाना कृत्रिम हात बसवण्यात आले असून नवीन जीवन देण्याचा प्रयत्न ग्राम सामाजिक परिवर्तनाने केला आहे. ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत पालघर जिल्ह्यातील खानिवडे, शेलवली, कमारे, विराथन खुर्द, नागले या पाच ग्राम पंचायती मध्ये काम सुरु आहे. गावाचे परिवर्तन करणे, गावाला सक्षम बनवणे, तीन वर्षात गाव आदर्श बनवणे, हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. यात गावातील शाश्वत कषि विकास, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण, पोषण, जलसंधारण, पाण्याची सुविधा, महिला बाळासाहेब ठाकरे स्मृतीसक्षमीकरण अश्या महत्वाच्या प्रश्नासोबत इतर अनेक प्रश्नांवर अभियान काम करते. दरम्यान खानिवडे गावात सर्वे केला असता सदर गावात २१ व्यक्ति या विविध प्रकारच्या दिव्यांग असल्याचे लक्षात आले. त्यापैकी २ व्यक्तीना हात नसल्याचे निदर्शनास आले. खानिवडे गावातील बारक्या वरखंडा यांनी मासेमारी करताना मनगटा पासून पुढील उजवा हात आणि काशिनाथ वरठा यांनी मनगटापासून पुढील दोन्ही हात गमावले. त्यामुळे त्याना रोजगार करता येत नसून त्यांची प्रकृतीही खालावली. तसेच स्वखर्चाने अशा प्रकारे कृत्रिम हात बसवणे शक्य नव्हते. या बाबत सदर दिव्यांग व्यक्तिना कशा प्रकारे मदत करता येईल या दृष्टीकोनातून अभियानाच्या माध्यमातून विचार करण्यात आला. त्यानुसार त्याना ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान पालघर मार्फत कृत्रिम हात बसवणे बाबत माहिती देण्यात आली. स्वयंसेवी संस्था रोटरी क्लब ऑफ ठाणे आणि ग्राम पंचायत खानिवडे यांच्या मार्फत हा खर्च करण्यात आला. डॉ. जितेश कारिया यांचेशी संपर्क करून कल्याण येथे झालेल्या शिबिरात दोन्ही लाभार्थ्यांना हात बसवण्यात आले तसेच वापराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या हातांमुळे दोन्ही व्यक्तींनी हात मिळाल्याचे समाधान व्यक्त करून अपंगत्वाचा न्यूनगंड कमी होण्यास मदत झाली. या हातांनी ते सायकल चालवणे, वस्तू हातात उचलणे, व इतर विविध कामे करू शकतात. अशी माहिती महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान पालघर चे नोडल अधिकारी तथा उप-मुख्य कार्यकारी अधिकारी, (ग्रामपंचायत) टी. ओ. चव्हाण व पालघर जिल्हा कार्यकारी नंदकिशोर शेळके यांनी दिली.